Sunday, January 16, 2022

Read Along Application Marathi

 आत्मविश्वासाने शिक्षण वाढवा



रीड अलॉंग या अॅप द्वारे लहानग्यांच्या वाचनासाठी अतीशय उपयुक्त असे शैक्षणिक अॅप आहे. अॅप द्वारे आपण कथा, कविता, इतर माहिती वाचन करु शकतो. वाचन करताना आपणाला मदतनीस देखील मिळतो जो अतीशय उत्तम प्रकारे तयार करण्यात आलेला. 

वाचन करत असताना दिलेली कृती पूर्ण झाल्यावर ता-यारुपी बक्षीसही मिळण्याची संधी या एपमध्ये आहे.

विशेषत: छोट्या मुलांसाठी हे अॅप अतीशय उपयुक्त आहे. त्यांचे वाचन कौशल्य वाढवण्यासाठी या अॅपचा वापर केला जाऊ शकतो.

ज्यांना आधीपासून मुळाक्षरांचे काही मूलभूत ज्ञान आहे त्यांच्यासाठी हे सर्वोत्कृष्ट आहे. अॅप सुरक्षितपणे ऑफलाइनही वापरता येते.

अॅप मध्ये कोणत्याही जाहिराती नसल्याने वापर करणे सुलभ आहे.

Read Along वापरण्यासाठी नाव, वय, विशिष्ट स्थान, संपर्क, ईमेल पत्ता किंवा फोन नंबर आवश्यक नाही. याव्यतिरिक्त, डिव्हाइसवर व्हॉइस डेटाचे रिअल टाइममध्ये विश्लेषण केले जाते, परंतु  Google सर्व्हरवर सेव्ह केले जात नाही.

Read Along App Download link


No comments:

Post a Comment