Monday, December 13, 2021

Information | Google Photos' feature tools

 गुगल फोटोजच्या वैशिष्टयपूर्ण टुल्सची माहिती..!



प्रत्येक जी-मेल अकाउंट आपल्याला 15 जीबी चा डाटा पूर्णपणे मोफत देत असते. गुगल फोटोजही याचाच एक भाग आहे. गुगल फोटोज मध्ये आपण मोबाईलच्या कॅमेरामधून काढलेले तसेच इतर प्लॅटफॉर्म्सवरुन डाउनलोड केलेले फोटो सेव्ह करु शकतो. गुगल फोटोज हे फोटोज एटोमॅटीकली सेव्ह करत असल्याने आपल्याला आर्वजून सेव्ह करण्याची गरज लागत नाही. सदर फोटोज तारेखनुसार सेव्ह केले जात असल्याने तुम्हाला फोटो कोणत्या काढला हे सहज समजते. तसच गुगल फोटो असे फोटोज अकाउंटला वर्षोनुवर्षे सेव्ह करुन ठवते. यामूळे तुमच्या फोटोजच्या आठवणींचा सुंदर असा अल्बम तयार होत राहतो.

तुमच्या मोबाईला काही प्रॉब्लेम आल्यास, मोबाईल बदलला तरीही देखील हे फोटो तुम्ही कधीही पाहू शकता कारण ते तुमच्या गुगलच्या अकाउंटवर असतात. मोबाईलवर नाही. फोटोज गुगलच्या क्लाउडवर सेव्ह राहत असल्याने तुमच्या मोबाईल मधील स्पेस शिल्लक राहू शकते.

आता आपण उपलब्ध असलेल्या टूल्सची माहीती घेवू

1) सर्च - यामध्ये आपण प्लेस - मॅप नुसार म्हणजेच जेव्हा आपण मोबालईचे नेट ऑन ठेवून फोटो काढतो तेव्हा तो फोटो कुठे काढला आहे याची नोंद गुगल ठवते त्यानुसार आपला मॅप तयार करुन तसे फोटोज आपल्याला पाहता येतात.

  थिंग्ज - मंदीर, हॉटेल, गड किल्ले अशा प्रकारच्या ठिकाणी फोटोज घेतले असतील तशी नोंदही ठेवून अशा ठिकाणचे फोटोज आपल्याला पाहता येतात.

तसेच फेव्हरेट केलेले फोटोज, नुकतेच समाविष्ट केलेले फोटोज यानुसार वर्गवारी करुनही आपल्याला फोटोज पाहता येतात.

याच बरोबर स्क्रिनशॉटस्, सेल्फीज, व्हिडीओज, 360 फोटो आणि व्हिडीओज, स्कॅन केलेले फोटोज, मोशन फोटोज यानुसारही आपल्याला आपले फोटोज सर्च करता येवू शकतात.

2) शेअरींग

गुगल फोटोज मध्ये आपण अनेक प्रकारे अल्बम तयार करु शकतो. असे अल्बम तुम्ही कोणालाही सहजरित्या शेअर करु शकता. शेअर करत असताना इ-मेल आय डी किंवा गुगल कॉन्टॅक्टमध्ये सदर व्यक्ती समाविष्ट असणे आवश्यक असते.

3) लायब्ररी

लायब्ररी टूल मध्ये आपण आपल्या मोबाईलमधील  फोल्डरचा गुगल फोटोजला होणार बॅकअप अडजस्ट करु शकतो

यासाठी आपल्या युटीलीटी या टॅबवर क्लिक करायच आहे नंतर डिव्हाईस फोल्डरर्स वर क्लिक करुन हव्या त्या फोल्डरला सिलेक्ट किंवा डी-सिलेक्ट करायच आहे.

4) युटीलीटी टुल मध्ये आपण आपले फोटोज पीन नुसार लॉक करुन ठेवू शकतो

पार्टनर अकाउंट तयार करुन कोलॅब्रेशनने कामही करु शकतो.

तसच

सुमारे 50 फोटोज एकत्र करुन सुंदर असे अॅनिमेश, 9 फोटोजचे कोलॅज, तर 50 फोटोज किंवा व्हिडोज एकत्र करुन त्यांचा सुंदर असा व्हिडीओ देखील तयार करु शकतो.

अशा प्रकारे गुगल फोटो मध्ये अनेकाविध वैशिष्ट्य समाविष्ट आहेत. या टूल्सचा अभ्यास करा, वापर करा आपल्या सुंदर क्षणांना गुगल फोटोजची साथ द्या.



डिजीटल शेंडे वैशिष्ट्यपूर्ण नाविण्ययुक्त टेक्निकल माहिती भरलेले विडीओज आपल्यासाठी घेवून येते. अशा प्रकारची उपयुक्त माहीती जाणून घेण्यासाठी  आमच्या ब्लॉगला, युट्यूब चॅनेलला सबस्काईब करा


No comments:

Post a Comment