Sunday, December 27, 2020

Digital Shende | 2020 Journey

 


साधारण मार्चच्या सुमारास कोरोनाचा विळखा सातारा सारख्या निमशहरी भागाला घट्ट होत गेला. सर्वत्र लॉकडाऊनची सुरुवात होत असतानाच शाळा, कॉलेजेस, सिनेमागृह, उद्योगधंदे बरोबर घराच्या बाहेर पडण्यासही मज्जाव शासनाने खबरदारी म्हणून बंदी घातली होती. जीवनावश्यक बाबी सोडून 100 टक्के लॉकडाऊन सुरु झाले.

अशा काळात 24 तास घरात बसून करणार तरी काय... डिजीटल मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट तसेच ऑनलाईन तंत्रशिक्षण घेण्याची आवड असल्याने सुमारे एक महिनाचा काळ तसा व्यस्तच गेला. त्यानंतर त्यातही कंटाळा येवू लागला. लॉकडाऊन असह्य वाटू लागले. अशातच ऑनलाईन कॉन्फरंस बाबत काही प्लॅटफॉर्म्स आहेत का याची माहिती विचारली गेली. त्यावेळी ऑनलाईन प्लॅटफॉम यांची शोध घेतली त्यातील काहीही समजले नाही. झूम बाबतच्या मर्यांदा स्पष्ट जाणवल्या. भारतीय वेबसाईटला लॉग इन केले (त्याकडून सप्टेंबर 2020 मध्ये उत्तर आले)

डिजीटल मार्केटिंग, वेव डेव्हलपमेंट याबाबतचा तसेच संगणक क्षेत्रातील अनुभव घरी काही स्वस्थ बसू देत नव्हता. काही तरी केलेच पाहिजे हा विचार घोंगावत होताच...

याच वेळी पुणे येथील एका कंपनीतून डिजीटल मार्केटिंग प्रशिक्षक म्हणून विचारणा झाली ही संधी मी घेतली. मार्चच्या रणरणत्या उन्हात आंब्याच्या, निलगीरी अगदी बाभळीच्या झाडाखाली गुगल हॅंगआऊट, व्हॉटस्अप कॉलींग वर सुमारे 15 दिवस रोज 2 तास डिजीटल मार्केटिंगची पहिली बॅच यशस्वीरित्या घेण्यात मी यशस्वी झालो.

यामधून स्फुर्ती मिळाल्याने एप्रिल 2020 च्या मध्यावर आपणाला ऑनलाईन कोर्सेस घेता येतील का बाबत पडताळणी सुरु झाली. टेक्निकल बाबतीत मूळातच आवड असल्याने यात आशेचा किरण दिसला. प्रथमत: डिजीटल मार्केटिंगची रिव्हीजन बॅच घेतली. त्यामध्ये मिळालेल्या यशाने ऑनलाईन तंत्रशिक्षण आपण देवू शकतो याची जाणिव झाली. मे 2020 मध्ये मी स्वत: डिजीटल मार्केटिंगची पहिली बॅच गुगल हॅंगआऊट वर यशस्वीपणे घेतली त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

कोरोना, लॉकडाऊन पूर्ण विसरुन ऑनलाईन डिजीटल मार्केटिंगचे शिक्षण घेणे आणि शिक्षण देणे याकडे पूर्ण लक्ष केंद्रीत केले.

या बॅच नंतर लगेचच ऑनलाईन वेबसाईट डेव्हलपमेंटची बॅचही सुरु केली. मोबाईलवर वेबसाईटचे HTML, CSS, JavaScript वापरुन Hard Coding द्वारे ट्रेनिंग देणारा बहुधा मीच असेन . या कोर्समधील सहभागी झालेले सर्वचजण कमालीचे उत्साही होते. घरी लॅपटॉप, कॉम्प्युटर नाही फक्त स्मार्टफोनवर वेबसाईटचे प्रॅक्टीकल यशस्वीरित्या करत असल्याने मलाही त्यांच्याकडून खरतर उत्साह मिळाला.

या कोर्समधील ट्रेनर्सकडून मला खूप काही शिकता आले. परिस्थिती कशीही असो तुम्हाला काही नवीन करायच असले शिकायच असेल तर येणारी अडचण ही अडचण राहत नाही तर ती संधी असते.

यातील सर्वच ट्रेनर्सनी चक्क मोबाईलवर HTML, CSS, JavaScript वापरुन Hard Coding द्वारे एक छोटीशी वेबसाईट केली. हे सर्व ट्रेनर्स सातारा मधीलच होते हे आवर्जून सांगाव वाटत. आपल्या सातारामध्ये किती प्रगल्भता आहे हे याची चुणूक मला यावरुन दिसून आली. गरज आहे ती योग्य मार्गदर्शानाची जी मी प्रामाणिकपणे देत आलोय. वैष्णवी देशमुख यांनी मोबाईलवर चक्क मराठी भाषेतून त्यांची वेबसाईट तयार केली खूप छान...

या वेबसाईटच्या यशस्वी बॅचनंतर मी मागे वळून पाहिलेच नाही... डिजीटल मार्केटींग, वेबसाईट डेव्हलपमेंट, युट्यूब मास्टर क्लास, ऑनलाईन डिजीटल इंटरपर्नशीप ऑपॉरच्युनिटीज कॅंप, एंट्रॉडक्शन टू पायथॉन प्रॉग्रॅमिंग, सायबर सेक्युरिटी, टेक सफर अशी अनेक छोटे छोटे ऑनलाईन कोर्सस घेत डिसेंबर 2020 पर्यंत सुमारे 125 ट्रेनर्सना मी तंत्रप्रशिक्षण देण्यात यशस्वी झालो आहे.

अर्थात याचं सर्व श्रेय प्रथम जातय ते सहभागी ट्रेनर्सना त्यांचा मी कायम आभारी आहे. सहभागी ट्रेनर्स कमालीचे उत्साही होते. त्यांनी कधीच वेळेची कुरकूर केली नाही. सातारी भाषेतील टेक्निकल प्रशिक्षण समजून घेतले प्रोत्साहन दिले. यातील काहींनी यशस्वी कामगिरी आजही चालू ठेवली आहे. काहींनी वेबसाईट डेव्हलपमेंट, युट्यूब, एमेझॉन अफेलियेट, ब्लॉगर यामध्ये आपला यशस्वी ठसा उमटवण्यास यश संपादन केले आहे.

यामध्ये सातारा, मुंबई, नाशिक, सांगली, पुणे येथील ट्रेऩर्सनी सहभाग घेतला. यात प्रामुख्याने विद्यार्थी, शिक्षक,  प्राध्यापक, शेतीउद्योगाशी निगडीत व्यवसायिक, मार्केटिंग क्षेत्रातील, तसच नुकतीच १०वी ची परिक्षा दिलेले विद्यार्थीही होते. विशेष म्हणजे १०वी ची परिक्षा  दिलेल्या या विद्यार्थ्यांनी डिजीटल मार्केटिंगच्या ऑनलाईन घेतल्या गेलेल्या छोट्या टेस्ट मध्ये खूप चांगले गुण मिळवलेत.

गुगल मीट मूळे सर्व कोर्सेस ऑनलाईन घेणे शक्य झाले. गुगल ने तारलं अस म्हटलं तर वावगे होणार नाही, डॉ. प्रा. दीपक ताटपुजे सर यांचे वेळोवेऴी मार्गदर्शन लाभले, घरातूनही उत्तम सहकार्य लाभल्याने उन्हाळा असो वा पावसाळा घरी बसून ऑनलाईन  सेशन्स घेणे शक्य झाले.

हे करत असतानाच तापोळा येथील तापोळा इको एग्रो टुरिझम, द निहाल रिसॉर्ट, मेतगुताड येथील गोल्डन स्प्रींग बंगलो यांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्यांच्या व्यवसायाचे टेक्निकल घडामोडीत मला सहभागी करुन घेतले यासाठी मी त्यांचाही ऋणी आहे.

एकंदरीत 2020 चे वर्ष असे खूप काही शिकवून देणारे गेले. या निमित्ताने एकच गोष्ट नव्हे तर अनुभव लक्षात राहीतो तो म्हणजे परिस्थिती कशीही असो जिद्द आणि चिकाटी असेल तुम्हाला यश तुमच्यापासून कधीच लांब जात नाही.

" मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची. "

No comments:

Post a Comment